ठाण्यातील सावरकर नगर येथील ‘ज्ञानोदय विद्या मंदिर’ शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक बाळा चिंदरकर, मार्गदर्शक शिक्षक साहेबराव महाजन आणि ‘लोकसत्ता’ समुहाचे वितरण व्यवस्थापक रौनक, संस्थेचे सचिव आर. एन. तिवारी व मराठी माध्यम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नरेश पाटील उपस्थित होते.
हा कार्यक्रम रविंद्र फाटक यांच्या आणि ‘लोकसत्ता’च्या सहकार्याने गेली दोन वर्षे सावरकर नगर, लोकमान्य नगर, रघुनाथ नगर, किसन नगर, कोपरी, पाचपाखाडी येथील सर्व मराठी शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. दहावीच्या तयारीबरोबरच यशाचीही तयारी करा, असे आवाहन संदेश चिंदरकर यांनी यावेळी केले. एच. डी. अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2013 7:02 am