कराडमध्ये व्यापा-याचे अपहरण, मारहाण; दोघांना अटक

आगाशिवनगर येथील व्यापाऱ्याला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या प्रकरणात दीपक पाटीलसह चैतन्य प्रकाश पवार यास अटक झाली आहे. पुण्याच्या दोघांना अटक करण्साठी पथक रवाना झाली आहेत.

आगाशिवनगर येथील व्यापाऱ्याला मारण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. या प्रकरणात दीपक पाटीलसह चैतन्य प्रकाश पवार यास अटक झाली आहे. पुण्याच्या दोघांना अटक करण्साठी पथक रवाना झाली आहेत. सचिन रामचंद्र झेंडे यांनी अपहरण व मारहाणीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अटक केलेला दीपक पाटील पोलिस रेकॉडवरील संशयित असून, २००९ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात गुंड सल्या चेप्यावरील हल्ल्यातील सूत्रधार आहे.
अभिजित व्यवहारे व अमित कोकाटे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. ते दोघेही पुण्याचे आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. या टोळीमागे अजून किती लोक आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत. सचिन झेंडे यांचा पुणे येथील अभिजित व्यवहारे यांच्याशी परिचयातून व्यवहार झाला होता. त्यांनी एकमेकांना व्यवसायासाठी काही रकमा उसनवारीने दिल्या होत्या. त्या देवाणघेवाणीतून अपहरण व खंडणीसारखा प्रकार घडला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 2 arrested for traders kidnapping and beating in karad