अविश्वास ठराव बहुमताने मंजूर
कांॅग्रेसमध्ये उभी फू ट पडल्यावर वध्र्याचे नगराध्यक्ष आकाश प्रमोद शेंडे यांच्यावरील अविश्वास ठराव आज प्रचंड बहुमताने पारित झाल्याने शेंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. शेंडेंविरुध्द भाजप, राकॉ, बसप, अपक्ष, तसेच कॉंग्रेसच्याच काही असंतुष्ट सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटिस बजावली होती. आज हा ठराव मांडण्यात आल्यावर झालेल्या मतदानात शेंडेंविरुध्द ३१ नगरसेवकांनी मतदान केले. शेंडेंना केवळ आठ मते मिळाली. शेंडे गटाविरुध्द प्रचंड असंतोष असल्याचे आजच्या घटनेतून दिसून आले.
भाजपचे आठ, राकॉचे नउ, बसपचे चार व कॉंग्रेसच्या आठ असंतुष्टांनी शेंडेंविरुध्द ठरावावर मतदान केले. २० महिन्यापूर्वी आकाश शेंडे यांना नगराध्यक्ष करण्यात खासदार दत्ता मेघे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. कांॅग्रेसच्या रणजित कांबळे गटाचे सदस्य त्यावेळी आकाश शेंडे विरोधात होते. पण, त्यांच्यावर श्रेष्ठींकडून दबाव आल्याने ते आकाश शेंडेंसाठी तयार झाले. त्यामुळे बसपच्या चार सदस्यांसह अपक्षांची मदत घेऊन कांॅग्रेसचे आकाश शेंडे नगराध्यक्ष बनले. मात्र, कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्यात नगराध्यक्ष गटाला यश आले नाही. नगराध्यक्ष सर्वाना विश्वासात घेत नाहीत, केवळ आप्तस्वकियांचीच कामे करतात, शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात, असे आरोप अविश्वासाच्या ठरावात करण्यात आले होते. कांॅग्रेसमधे फू ट अटळ असल्याचे दिसून आल्यावर नगराध्यक्ष गटाचे नेते शेखर शेंडे यांनी भाजपशी संधान साधणे सुरू केले होते. भाजपचे संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्याशी चर्चा झाली. तडजोडीचा फोम्र्युलाही तयार झाला. मात्र, शेंडेंच्या भाजप प्रवेशास भाजपच्या सर्व सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला. ज्या शेंडे गटाने भाजप सदस्यांची कायम मानहानी केली, भाजपला सतत शिव्या घातल्या, आता त्याच शेंडे गटाच्या पंगतीत आम्हाला बसणे शक्य नाही. शेंडेंना सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही सर्व सदस्य भाजपला सोडचिट्ठी देऊ, असा निर्णायक इशारा भाजप सदस्यांनी दिल्याने भाजपश्रेष्ठी वरमले. शेंडे परत एकाकी पडले. कॉंग्रेसची सत्ता गेली.
विशेष म्हणजे, आजच्या अविश्वासाच्या ठरावावर सेनेचे मनोज रोकडे यांनी भाजपला साथ न देता शेंडेंसोबत जाणे पसंत केले होते. शेंडे यांना हटविण्यात असंतुष्ट कांॅग्रेस सदस्यांसोबतच राकांॅच्या सदस्यांनीही मोठा पुढाकार घेतला होता. कारण, शेंडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरले तेव्हाच म्हणजे २० महिन्यापूर्वीच राकांॅने काढता पाय घेतला होता. ज्या शेखर शेंडेंविरुध्द निवडणूक लढवून प्रा.सुरेश देशमुख आमदार झाले त्याच शेंडेंना अध्यक्षपद देणे शक्य नसल्याची भूमिका राकॉंने घेतली होती. मात्र, तरीही खासदार मेघे यांनी नगराध्यक्ष केल्याने शेंडेंविरुध्द राकॉ सदस्य पेटूनच होते. आज त्यांचाही राग शांत झाल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष आकाश शेंडे पायउतार झाल्याने पुढील अध्यक्ष कोण, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
वध्र्याचे नगराध्यक्ष आकाश शेंडे अखेर पायउतार
अविश्वास ठराव बहुमताने मंजूर कांॅग्रेसमध्ये उभी फू ट पडल्यावर वध्र्याचे नगराध्यक्ष आकाश प्रमोद शेंडे यांच्यावरील अविश्वास ठराव आज प्रचंड बहुमताने पारित झाल्याने शेंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
First published on: 27-08-2013 at 08:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash shende takes backstep no confidence resolution passed