आपले घराणे, घराण्यातील कर्तबगार व्यक्ती यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्या काळातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती समजून घेण्याकरताही घराण्याचा कुलवृत्तान्त उपयोगी पडतो. ब्राह्मण ज्ञातीतील अनेक घराण्यांचे कुलवृत्तान्त आजवर प्रकाशित झाले असून ‘आपटे’ घराण्याच्या कुलवृत्तान्तला इतिहासाचा पुराणपुरुष म्हणता येईल. आपटे कुलवृत्तान्त प्रकाशित झाल्याला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
आप्त आपटे सेवा कार्य समितीतर्फे आता पुन्हा एकदा नव्याने आपटे कुलवृत्तान्त प्रकाशित करण्यात येणार आहे. या समितीचे खजिनदार आणि प्रशासक वसंत आपटे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, आत्ता प्रकाशित होणारी कुलवृत्तान्तची चौथी आवृत्ती असेल. सध्या २५० आपटे मंडळींचे नवीन अर्ज आमच्याकडे आले आहेत. हा कुलवृत्तान्त सुमारे पाचशे पानांचा असून तो मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याचा विचार आहे. नव्याने आम्ही जी माहिती संकलित करत आहोत त्याचे पूर्णपणे संगणकीकरण करण्यात येत आहे. समितीचे सल्लागार माधव आपटे म्हणाले की, ‘आपटय़ांचा इतिहास’ या नावाने आमचा कुलवृत्तान्त १९१४ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील हा पहिला छापील कुलवृत्तान्त म्हणता येईल. त्यानंतर १९३९ मध्ये दुसरी आवृत्ती, १९४७ मध्ये पुरवणी, १९९९ मध्ये तिसरी आवृत्ती आणि २००५ मध्ये त्याची पुरवणी प्रकाशित झाली होती. आता नव्याने प्रकाशित होणारा कुलवृत्तान्त ‘शताब्दी कुलवृत्तान्त’ म्हणून प्रकाशित होणार आहे.
नवे तंत्रज्ञान आणि माहिती युगाचा विचार करून हा नवा कुलवृत्तान्त मुद्रीत स्वरूपाबरोबरच सीडी आणि पेन ड्राईव्ह मध्येही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कुलवृत्तान्तमध्ये सर्व आपटे कुल बंधू-भगिनींबरोबरच ‘प्रसिद्ध आपटे’ यांची माहिती असेल. प्रसिद्ध आपटे व्यक्तींच्या माहितीबरोबरच ती व्यक्ती ज्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे, त्या क्षेत्राची थोडक्यात माहिती, त्यातील नवे प्रवाह आम्ही देणार असल्याची माहितीही आपटे यांनी दिली. अधिक माहिती आणि संपर्क Madhavapte1933@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
कुलवृत्तान्तच्या इतिहासाचा पुराणपुरुष!
आपले घराणे, घराण्यातील कर्तबगार व्यक्ती यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्या काळातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती
First published on: 10-01-2014 at 06:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apte kulvrutant published completed 100 years