सोलापूर जिल्हय़ात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाची ठिणगी पेटली असतानाच कुर्डूवाडी येथे संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांच्या कार्यालयावर साखरसम्राटांच्या चिथावणीवरून हल्ला करण्यात आला. या वेळी घाटणेकर यांना बेदम मारहाण झाली. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
घाटणेकर हे कुर्डूवाडी येथे आपल्या कार्यालयात दुपारी १२.३०च्या सुमारास आपले सहकारी शिवाजी पाटील, मारुती नलावडे, बापू लोकरे, अशोक पवार यांच्यासह चर्चा करीत बसले असताना अचानकपणे आलेल्या एका जमावाने कार्यालयावर हल्ला केला. गांधीगिरी करून साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करतोस काय, असे म्हणून या जमावातील दोघा-तिघाजणांनी घाटणेकर यांना बेदम मारहाण केली. यात त्यांना बरीच दुखापत झाली. या जमावाने कार्यालयाची मोठय़ा प्रमाणात मोडतोड केल्याचे घाटणेकर यांनी सांगितले. माढा तालुक्यातील साखरसम्राटांच्या चिथावणीमुळेच आपल्या कार्यालयावर हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2013 रोजी प्रकाशित
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कुर्डूवाडीतील कार्यालयावर हल्ला
सोलापूर जिल्हय़ात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतलेल्या आंदोलनाची ठिणगी पेटली असतानाच कुर्डूवाडी येथे संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांच्या कार्यालयावर साखरसम्राटांच्या चिथावणीवरून हल्ला करण्यात आला.
First published on: 08-11-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on the swabhimani farmers association office in kurduwadi