देशातील मोठय़ा राजकीय पक्षांची भूमिका अनेक बाबतीत देशहिताला साधक न ठरता बाधक ठरत आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, अनैतिकता यांची बजबजपुरी माजली आहे. आज देशाला व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. भारत स्वाभिमान न्यास २०१४ च्या दृष्टीने स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वाखाली राजकीय पक्षाचा विकल्प देण्यास तयार आहे, अशी माहिती भारत स्वाभिमान, महाराष्ट्र (पूर्व) चे प्रदेशाध्यक्ष विष्णू भुतडा यांनी दिली.
येथे महिला पतंजली योगसमिती द्वारा आयोजित भाषण, निबंध, गायन, योगासन स्पर्धेतील, तसेच अन्य उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत होते. ते म्हणाले, देशातील राजकीय पक्षांनी आपली विष्टद्धr(२२४)वसनीयता गमावली आहे. त्यांची लुटीची प्रवृत्ती वाढत आहे. देश माफियाराजकडे वाटचाल करीत आहे. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद, स्वदेशी, शिक्षण व संस्कार या देशव्यापी उपक्रमांसोबतच स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वाखाली खेडय़ापाडय़ात जनजागरण व संघटना बांधणी केली जात आहे. यातूनच राजकीय पक्षाच्या विकल्पाची मागणी समोर आली आहे.
स्वामी रामदेव ९ एप्रिलला शेगाव येथील महिला सशक्तीकरण आणि योगदीक्षा महासंमेलनात या संबंधात बोलतील. अधिकाधिक संख्येत महिलांनी शेगाव येथील या महासंमेलनात भाग घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविक महिला पतंजलीच्या संध्या बान्ते यांनी केले. आभार महामंत्री गीता इलमे यांनी मानले.