मनुष्यबळ विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल वेकोलिच्या मनुष्यबळ विकास विभागाला कोल इंडियाच्या ३९ व्या वर्धापन दिनी ‘कार्पोरेट परफॉर्मस् अ‍ॅवार्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुनर्वसन आणि पुनर्रचना कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल या निमित्ताने वेकोलिच्या उमरेड क्षेत्राला ‘कार्पोरेट आर अ‍ॅण्ड आर अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले. वेकोलिचे कार्मिक संचालक रूपक दयाल यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले. कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, कोळसा राज्यमंत्री प्रतीक प्रकाशबापू पाटील, कोळसा सचिव एस.के. श्रीवास्तव, कोल इंडियाचे अध्यक्ष एस. नरसिंह राव आदी उपस्थित होते. कोल इंडियाच्या आठ कंपन्यांमध्ये वेकोलिला मिळालेले हे पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतीक आहेत.
बिग बाजारच्या फ्रँचायझी सेंटरचे अनावरण
फ्यूचर ग्रुपच्या पहिल्या बिग बाजार डायरेक्ट फ्रँचायझी सेंटरचे अनावरण  छोटय़ा पडद्यावरील कलावंत, निवेदक जय भानुशाली यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाला फ्यूचर ग्रुपचे संचालक विवेक बियानी आणि प्रकल्प संचालक अभय कुमत प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील इच्छुक उद्योजक आणि बिग बाजार डायरेक्ट फ्रँचायझीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले. यात फ्रँचायझी बिग बाजारची उत्पादने ग्राहकांना ३जी इंटरनेटयुक्त टॅबल्टेच्या माध्यमातून विकणार आहे. हे टॅब्लेट बिग बाजारच्या बँक एन्डशी जोडलेले असेल. यातून ग्राहकांना मागणी केलेली उत्पादने पोहोचविली जातील.
बिग बाजार डायरेक्ट हे डिजिटायझेशन आणि इमारत अशा दोन्ही प्रकारात व्यवसाय करणारे मॉडेल आहे. यात दुकानदार, इच्छुक उद्योजक, गृहिणी आणि विविध प्रकारच्या सेवा पुरवठादारांना तीन लाख रुपयांची गुंतवणूक करून बिग बाजार डायरेक्ट फ्रँचायझी होण्याची संधी मिळते. अधिक माहितीसाठी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट बिगबाजारडायरेक्ट डॉट कॉम वर लॉग इन करून कर्ज करता येईल किंवा ०८८८२९४४४२२ वर संपर्क साधवा.