डोंबिवली पूर्व, नेहरू मैदान भागातील इंदिरा निवास ही अतिधोकादायक इमारत गुरुवारी दुपारी पालिकेच्या ‘फ’ प्रभागाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. लोडबेअरिंग पद्धतीची चार माळ्याची ही इमारत होती. या इमारतीत एक कुटुंब राहत होते. महापालिकेने यापूर्वीच या इमारतीच्या मालकाला इमारत धोकादायक झाल्याची नोटीस दिली होती. त्यामुळे येथे रहाणारे कुटुंब इमारत सोडून अन्यत्र राहण्यास गेले होते. पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती असतील त्या तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ‘फ’ प्रभाग अधिकारी विनायक पांडे, राठोड, संजय कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी अग्निशमन दल, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
डोंबिवलीत अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त
डोंबिवली पूर्व, नेहरू मैदान भागातील इंदिरा निवास ही अतिधोकादायक इमारत गुरुवारी दुपारी पालिकेच्या ‘फ’ प्रभागाच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. लोडबेअरिंग पद्धतीची चार माळ्याची ही इमारत होती.
First published on: 16-05-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous building demolished in dombivali