स्वतच्या फायद्यासाठी भूखंडाचे आरक्षण बदलून मदानाच्या जागी टॉवर आणि शाळेच्या ठिकाणी जिम उभारण्याची उदाहरणे नवीन नाहीत. उत्तर मुंबईतील आमदारांनी आता त्यात डायलिसिस केंद्राची भर टाकली आहे. दहिसरमध्ये प्रसुतीगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या जागेवर चक्क डायलिसिस केंद्र सुरू झाले आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवल्यावर प्रशासनाने आता जागे होत कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
शहराचा विकास करताना नागरिकांच्या गरजा, पायाभूत सुविधा यांचा विचार करून काही जागा आरक्षित ठेवल्या जातात. एकीकडे पालिकेची प्रसुतीकेंद्रे अपुरी पडत असल्याची ओरड होत आहे. प्रसुतिगृहे बंद होत असल्याच्या, प्रसुतिगृहाचे फलक लावून जागा दुसऱ्याच कारणांसाठी वापरल्या गेल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रसुतिगृहासाठी राखून ठेवलेल्या जागेत डायलिसिस केंद्र उभे राहिल्याने वादाला तोंड फुटले आहे. दहिसर पश्चिम येथील जयवंत सावंत रस्त्यावरील जागा प्रसुतिगृहासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. या जागेवर सरकारी व खासगी सहकार्यातून प्रसुतिगृह उभारणे आवश्यक होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने येथे प्रत्यक्षात डायलिसिस केंद्र उभे राहिले. फेब्रुवारीमध्येया जागेवर ‘मिटी लाइफ लाइन’ हॉस्पिटलच्या डायलिसिस केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या प्रमुख पाहुण्यांमध्येआमदार विनोद घोसाळकर व विनोद शेट्टी यांची नावे होती. डायलिसिस केंद्राच्या उद्घाटनानंतर पालिकेतील विरोधी पक्षांनी याबाबत आक्षेप घेतला. आर उत्तर व आर मध्य प्रभाग समितीमध्येही विरोध करण्यात आला. स्थायी समितीमध्येही प्रसुतीगृहांच्या दुरावस्थेवरील चच्रेदरम्यान हा मुद्दा निघाला तेव्हा सत्ताधाऱ्यांनी मिठाची गुळणी धरून मुद्दा निकाली काढला.
पीपीपी तत्त्वावर विकास करण्याच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी पालिकेच्या आरक्षित असलेल्या जागा दुसऱ्याच कारणांसाठी वापरल्या जात आहेत. या व्यावसायिकीकरणाविरोधात आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली. तर दहिसर येथील मिटी लाइफ लाइन डायलिसिस केंद्राची उभारणी अयोग्य आहे. ती जागा खाली करून देण्यासंबधी कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संजय देशमुख यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2014 रोजी प्रकाशित
पालिकेच्या प्रसुतिगृहासाठी आरक्षित भूखंडावर डायलिसीस केंद्र
स्वतच्या फायद्यासाठी भूखंडाचे आरक्षण बदलून मदानाच्या जागी टॉवर आणि शाळेच्या ठिकाणी जिम उभारण्याची उदाहरणे नवीन नाहीत.

First published on: 06-05-2014 at 06:36 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dialysis centre on the corporation reserved plots for the delivery centre