नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार विलास मुत्तेमवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपत्तीवर आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. या संपत्तीची निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
खासदार मुत्तेमवार यांनी या प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या निवासी संपत्तीत मुंबईतील वरळी येथे १३५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत एक कोटी १० लाख रुपये इतकी दाखवली आहे. मात्र, त्याची रेडीरेकनर किंमत पाच कोटी रुपयाहून अधिक आहे. नागपूरमधील धंतोलीतील विजयानंद सोसायटीत १०५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत १५ लाख रुपये दाखवली आहे. वास्तविक त्याची रेडीरेकनर किंमत ६० लाखांहून अधिक आहे. नवी दिल्ली येथील जवाहर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत १२५३ चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटची किंमत ५५ लाख रुपये दाखवली आहे. त्याची रेडीरेकनर किंमत १.३ कोटी रुपयाहून अधिक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मयंक गांधी यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘मुत्तेमवारांच्या संपत्तीची चौकशी निवडणूक आयोगाने करावी’
नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार विलास मुत्तेमवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपत्तीवर आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले
First published on: 08-04-2014 at 06:59 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec should inquiry of vilas muttemwars property