सोलापुरातील दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा बंगला फोडून चोरटय़ांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. या गुन्हय़ाची नोंद सदर बझार पोलीस ठाण्यात झाली आहे.
डॉ. फडकुले यांचे चिरंजीव प्रा. डॉ. अजित फडकुले व त्यांचे कुटुंबीय उत्तर सदर बझार भागातील विद्यानगरातील ‘विवेक’ बंगल्यात राहतात. काही दिवसांपूर्वी प्रा. अजित फडकुले हे कुटुंबीयांसह थायलंड येथे सहलीला गेले होते. त्याचवेळी चोरटय़ांनी त्यांच्या बंद बंगल्यात चोरी केली. बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील कटाप फोडून त्यातील सोन्याचे दागिने व २३ हजारांची रोकड असा एकूण ६३ हजारांचा ऐवज चोरून नेला. दिवंगत डॉ. फडकुले यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांचे स्मृतिचिन्ह व इतर वस्तूंना चोरटय़ांनी हात लावला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात डॉ. फडकुले यांच्या बंगल्यातून सोने, रोकड लंपास
सोलापुरातील दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा बंगला फोडून चोरटय़ांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. या गुन्हय़ाची नोंद सदर बझार पोलीस ठाण्यात झाली आहे.
First published on: 30-07-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold and cash stolen from dr phadkule bungalow in solapur