‘गं्रथाली’ प्रकाशनचा ३८ वा वाचकदिन बुधवार, २५ डिसेंबर रोजी होत असून त्यानिमित्त कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावर ‘आमचं जग, आमची भाषा’ हा परिसंवाद होणार आहे. तसेच सात पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
वाचकदिनाचा कार्यक्रम दुपारी ४.०० वाजता सुरू होईल. संगीता धायगुडे लिखित ‘हुमान’, उमेश कदम लिखित ‘शापित भूमी’, शरद बेडेकर लिखित ‘मला समजलेले पाच हिंदू धर्म’, सुधीर-नंदिनी थत्ते लिखित ‘हिंदूधर्मविषयक तत्त्वचिंतन’ आणि ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने २०१३’, दिलीप पांढरपट्टे लिखित ‘१२५ बोधकथा-भाग दोन’, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ/अनुराधा मोहनी अनुवादित ‘गुलजारांची कविता’, सुलभा कोरे लिखित ‘स्पर्श हरवलेले’ या सात पुस्तकांचे प्रकाशन होईल.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता बदललेल्या जगातील जगण्याचा वेध घेणारा ‘आमचं जग, आमची भाषा’ हा परिसंवाद होईल. त्यात अंबर हडप, इरावती कर्णिक, कौशल इनामदार, अतिशा नाईक, वीणा जामकर, फुलवा खामकर, धर्मकीर्ती सुमंत, वीरेंद्र प्रधान आणि रवी जाधव हे सहभागी होतील, असे सुदेश हिंगलासपूरकर यांनी कळवले आहे.