तिसऱ्या अखिल भारतीय दोन दिवसीय गुरू रविदास साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) होणार आहे. या निमित्त सकाळी ग्रंथ परिवर्तन फेरी काढण्यात येणार आहे. जायकवाडी वसाहतीतील कल्याण मंडपम येथे होणाऱ्या या संमेलनाचे सकाळी १० वाजता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री सी. दामोधर राज नरसिम्हा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.संमेलनात नृत्याविष्कार, कथाकथन, परिसंवाद, शाहिरी जलसा, कविसंमेलन, चर्चासत्र, महिला परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. समारोप संमेलनाध्यक्ष प्रा. जगदीशचंद्र सितारा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी ३ वाजता होणार आहे.
संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष महापौर प्रताप देशमुख, अखिल भारतीय गुरू रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेशाध्यक्ष बालाजी जमदाडे आदींनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
गुरू रविदास साहित्य संमेलनास आज प्रारंभ
तिसऱ्या अखिल भारतीय दोन दिवसीय गुरू रविदास साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) होणार आहे. या निमित्त सकाळी ग्रंथ परिवर्तन फेरी काढण्यात येणार आहे.
First published on: 09-11-2012 at 11:03 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru ravidas sahitya sammelan started