डोंबिवली परिसरात गेले काही दिवस सुरू असलेल्या विनयभंग, बलात्कार घटनांच्या पाश्र्वभूमीवर संकटात असलेल्या मुलींना मदत करण्यासाठी शिवसेनेच्या डोंबिवली महिला शाखेने हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. ही हेल्पलाइन २४ तास कार्यरत असणार आहे.
पीडित मुलीला सर्व प्रकारची मदत या हेल्पलाइनच्या माध्यमातून केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करणे, कोणी दबाव टाकत असेल, कोणाकडून छळवणूक होत असेल याबाबत मदत करण्यासाठी शिवसेनेतर्फे हेल्पलाइनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. मदतीसाठी संपर्क – स्मिता बाबर ९३२३८८७४०१, ममता घाडीगावकर ९२२३१६३१६१, रेखा चौधरी ८८७९२२९७३९, विनीता बने ९७०२१८३४९५, किरण मोंडकर ८६५५७९६६६१.