लोणार शहरात खुलेआम अवैध धंद्याने थैमान घातले असून, यामुळे दंगलग्रस्त शहराची कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. या अवैध धंद्यांमुळे पुन्हा दंगल होऊ शकते, असे जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात भाजप शहर अध्यक्ष विजय मापारी यांनी नमूद केले आहे.
या निवेदनानुसार शहरात वाहतूक पोलिसांनी बिनधास्त हप्ते सुरू केले आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना तीन वाहतूक पोलीस असतांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शहरात विनापरवाना अवैध देशी दारू धंदा जोमात सुरू आहे. गरिबांचे संसार उध्वस्त करणाऱ्या मटक्याची खुले आम दुकाने थाटून, तसेच तितली भंवरा या नव्यानेच आलेल्या जुगाराने काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची लूट सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने मंठा बायपासवरून हजारो रुपये घेऊन अवैध मांस विक्री करणारे ट्रक सोडले जातात. शहरात जातीय दंगल होऊन सहा महिन्यांचा कालावधी जात नाही तोच अवैध धंद्य्ोवाल्यांनीही तोंड वर काढले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष विजय मापारी, भाजयुमोचे शहराध्यक्ष गजानन मापारी, गणेश तनपुरे, सुंदर संचेती, तेजराव पोफळे, अनिल मापारी, दिलीप मापारी, समाधान मापारी, राजू पुरी, कैलास मापारी, संजय देशमुख, ज्ञानेश्वर मापारी, सुनील मापारी, मनोज तोष्णीवाल, किशोर मापारी, विनोद दांडगे व अनिल शेषराव मापारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात केली असून त्यांच्या प्रतिलिपी महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, अमरावतीचे पोलीस आयुक्त व मेहकरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Oct 2013 रोजी प्रकाशित
लोणारमध्ये अवैध धंदे जोमात
लोणार शहरात खुलेआम अवैध धंद्याने थैमान घातले असून, यामुळे दंगलग्रस्त शहराची कायदा व सुव्यवस्था राहिली नाही.
First published on: 04-10-2013 at 08:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal business in lonar at pik condition