सानुग्रह मदतीच्या वाटपाबाबत समाधानी
तिरोडा व गोंदिया तालुक्यातील चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावकऱ्यांना घराच्या पुनर्बाधणीसाठी तात्काळ वाढीव मदत द्या आणि त्यासाठी पशाची व्यवस्था करा, असे निर्देश प्रफुल्ल पटेल यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
तिरोडा तालुक्यातील सेजगाव, सहेसपूर येथे केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची व्यथा त्यांच्यापुढे मांडली. तिरोडा तहसील कार्यालयाने तात्काळ मदत म्हणून सानुग्रह मदतीचे वाटप केल्याबद्दल पटेल यांनी समाधान व्यक्त केले.
मात्र हे पुरेसे नाही. ज्या प्रमाणात नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी शासनाच्या घर पुनर्बाधणीसाठी मिळणारी २४०० किंवा ४८०० रुपयांची मदत या नुकसानग्रस्त कुटुंबीयांना का दिली नाही, अशी विचारणा यावेळी पटेल यांनी तिरोडाचे तहसीलदार कल्याण डहाट यांना केली तेव्हा त्यासाठी पसा उपलब्ध नसल्याचे सांगताच पटेल यांनी मंत्रालयात आणि विभागीय आयुक्त कार्यालयात तात्काळ संपर्क करून संबंधितांना पसा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
एवढेच नाही, तर या मदतीसाठी सतत पाठपुरावा घ्या, अशी सूचनाही त्यांनी तहसीलदारांना केली.