केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी देशातील लोकांना त्यांच्या मातृभाषेसह हिंदी वापरण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आणि असे म्हटले की, भारताला भाषांच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनानिमित्त एका मेळाव्याला संबोधित करताना हे वक्तव्य केले.“आत्मनिर्भर असणे म्हणजे केवळ देशामध्ये उत्पादन करणे नव्हे, भाषांच्या बाबतीतही आपण ‘आत्मनिर्भर’ असणे आवश्यक आहे. जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते? ते दिवस गेले जेव्हा हिंदीत बोलणे हा चिंतेचा विषय होता”, असंही अमित शाह म्हणाले.

गृहमंत्री पुढे म्हणाले, “भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे. ”


हिंदी दिवसाच्या निमित्ताने, मी सर्व देशवासियांना विनंती करतो की, मूलभूत कार्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेसह हिंदी ही अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या हिंदीचा उत्तरोत्तर वापर करण्याची प्रतिज्ञा घ्या. भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषा यांच्या समन्वयात आहे. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं शाह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार हिंदी आणि इतर भारतीय भाषांच्या समांतर विकासासाठी वचनबद्ध आहे. भावना व्यक्त करण्यासाठी भाषा हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आपल्या सांस्कृतिक चेतनेचा आणि राष्ट्रीय एकतेचा आधार असण्याव्यतिरिक्त, हिंदी प्राचीन सभ्यता आणि आधुनिकता आणि प्रगती यांच्यातील सेतू म्हणूनही काम करते. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हिंदी आणि इतर सर्व भारतीय भाषांचा समांतर विकासासाठी सातत्याने वचनबद्ध आहोत”, असं शाह यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हिंदी दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की हिंदीला एक जोमदार भाषा बनवण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.