रॉकिंग एन्टरटेनमेंटच्या वतीने  वुईथ लायन्स क्लब मेट्रोपोलिटनच्या सहकार्याने आयोजित महा आंतरशालेय ‘झलक डान्स के महारथी’ची पहिली ऑडिशन टिप टॉप कॉन्व्हेंटमध्ये १७ ऑगस्टपासून सुरू झाली. यात ६२ स्पर्धकांनी भाग घेतला. यासाठी प्राचार्या प्रीती सिरास आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा उईके तसेच सुजाता तायडे, मोहना नाटकर, प्रणिता दाणी या शिक्षिकांचे सहकार्य लाभले. ऑडिशनचे परीक्षण जय लाहोरी आणि पवन सोनटक्के यांनी केले. गणेशवंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘स्टुंडट ऑफ द इयर’ चित्रपटातील ‘राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर संपदा तागडेने नेत्रदीपक नृत्य सादर करून साऱ्यांची मने जिंकली. घागरा, बेजुबान, बार्बी गर्ल यावरही नृत्यांची झलक पेश करण्यात आली. येत्या सोमवारी, १९ ऑगस्टला सयोना पब्लिक स्कूलचे विद्यार्थी ऑडिशनमध्ये सहभागी होणार असून ही प्रक्रिया येत्या ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. उपांत्य फेरी १ सप्टेंबरला तर महाअंतिम फेरी ८ सप्टेंबरला रंगणार असल्याचे रॉकिंग एन्टरटेनमेंटच्या सूत्रांनी एका पत्रकातून कळविले आहे. अधिक माहितीसाठी ९६७३५०४७०० आणि ९३७२७२५८७०६ या मोबाईलवर इच्छुकांना संपर्क साधता येईल.