भारतीय संस्कृतील ‘अक्षय्यतृतीया’ अर्थात साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व असून या दिवशी केलेली खरेदी किंवा दिलेले दान ‘अक्षय्य’राहते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या अक्षय्यतृतीच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा सोनेरी मुहूर्त म्हणून ‘लोकसत्ता’ने सुवर्ण लाभ योजना आणली आहे. ही योजना ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत सुरू राहणार आहे.
‘लोकसत्ता सुवर्ण लाभ’ योजनेत सहभागी असलेल्या सोने व सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या दुकानांमधून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने किंवा सोन्याचे दागिनी खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकाला ‘लकी कूपन’ दिले जाणार आहे. ग्राहकाने हे कपून भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे.
योजनेच्या शेवटच्या दिवशी योजनेत सहभागी असलेल्या दुकानांमधून सर्व कूपन जमा केली जाणार आहेत. सर्व कूपन्स एकत्र करून त्यातून सोडत पद्धतीने विजेत्याची निवड केली जाणार आहे. ‘सुवर्ण लाभ योजने’तील विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’ मधून जाहीर केली जाणार आहेत.
विजेत्यांना कार, परदेशी सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन या सारखी बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
‘एक्झर्बिया’ आणि ‘गुडविन ज्वेलर्स’ हे या उपक्रमाचे सहभागीदार आहेत. तसेच ‘गुणाजी एंटरप्रायजेस’, ‘फ्रेंड्स इलेक्ट्रॉनिक्स’, ‘द ड्रीम व्हेकेशन्स’ आणि ‘टेंझो टेम्पल’ हेसुद्धा या उपक्रमाचे प्रायोजक आहेत.c
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2014 रोजी प्रकाशित
अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’सुवर्ण लाभ योजना!
भारतीय संस्कृतील ‘अक्षय्यतृतीया’ अर्थात साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व असून या दिवशी केलेली खरेदी किंवा दिलेले दान ‘अक्षय्य’राहते अशी श्रद्धा आहे.

First published on: 29-04-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta suvarna labh yojna