‘म्हाडा’तर्फे मे २०१२ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमधील मालवणी, विनोबा भावे नगर, प्रतीक्षा नगर येथील घरांच्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले असल्याने आता पात्र अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र देण्यास ‘म्हाडा’ने सुरुवात केली आहे. तसेच २०१३ च्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांसाठी लॉटरीनंतरची ऑनलाइन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १४ डिसेंबर रोजी शिबीर होणार आहे.ं‘म्हाडा’तर्फे २०१२ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमधील मालाड मालवणी (संकेत क्रमांक २८३), कुर्ला- विनोबा भावे नगर (संकेत क्रमांक २८४, २८५) आणि शीव-प्रतीक्षानगर टप्पा चार (संकेत क्रमांक २८६) या योजनांमधील घरांच्या इमारतींची ताबा प्रक्रिया रखडली होती. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ‘म्हाडा’ने तात्पुरते देकारपत्र पाठवण्यास सुरुवात केली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर १५ दिवसांत ‘म्हाडा’च्या उपमुख्य अधिकारी (पणन) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.