नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तालुक्यातील शिवलीमोड येथे एक हजार जनावरांची चारा छावणी उभारण्यात आली आहे. शांतिवीर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते छावणीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ दुर्गे, जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हा चिटणीस सुरेंद्र आकनगिरे, अभय साळुंके उपस्थित होते. गेल्या ८ दिवसांत २०० हून अधिक बैलजोडय़ा, दुभती जनावरे छावणीत दाखल झाली आहेत. या जनावरांना आधार देण्यासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी पुढाकार घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
औशातील जनावरांसाठी मनसेने उभारली छावणी
नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तालुक्यातील शिवलीमोड येथे एक हजार जनावरांची चारा छावणी उभारण्यात आली आहे. शांतिवीर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते छावणीचे उद्घाटन करण्यात आले.
First published on: 05-04-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns opened camp for pet animal in ausha