राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या महापौरांच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने महापौर संदीप जोशी या हल्ल्यातून वाचले. वाहनामधील कोणालाही दुखापत झाली नाही. हल्ल्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला. महापौर संदीप जोशी यांना १२ दिवसांपासून धमक्या देखील येत होत्या, अशी देखील माहिती समोर आली आहे. पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

नागपूर शहारातील वर्धा रोड एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ हा हल्ला करण्यात आला. महापौर संदीप जोशी  कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. यानंतर ते परतताना त्यांचा वाहनाचा पाठलाग करत  दुचाकीस्वा हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर तीन गोळ्या चालवल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहनाच्या मागील बाजने हल्लेखोर दुचाकीवर आले होते. मी स्वतः वाहन चालवत होतो. माझ्या सीटच्या बाजूच्या काचेवरती एक गोळी, दुसरी गोळी मधल्या सीटवर आणि मागील बाजूस तिसरी गोळी मारण्यात आल्या. यानंतर माझे वाहन रस्त्याचे कडेला गेले, यामुळे आम्ही सर्वजण वाचलो. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. मला ६ डिसेंबर रोजी पहिली तर १२ डिसेंबर रोजी दुसरी धमकी मिळाली होती. त्यामुळे हल्लेखोर मागावर असावेत, असा संशय आहे. नागपूर पोलीस निश्चितच हल्लेखोरांना शोधुन काढतील असा विश्वास आहे, अशी महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.