सेवानिवृत्त प्राथनिक शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची पुन्हा एकदा ग्वाही आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे समाजातील महत्व मांडतानाच त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत मान्यवरांनी नाशिक मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात शिक्षकांना खूष करण्याचा प्रयत्न केला.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात आयोजित मेळाव्यात महापौर अशोक मुर्तडक यांनी समाजाचा खरा मार्गदर्शक शिक्षकच असतो असे सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या यशस्वी जीवनाचा पाया शिक्षकांकडूनच घातला जातो. त्यामुळेच समर्थ समाजाची निर्मिती होत असते, असे मुर्तडक यांनी नमूद केले. माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यांनी सेवानिवृत्तांचा गौरव करतानाच त्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. आपण सर्व सेवानिवृत्त शिक्षक तर आहातच शिवाय ज्येष्ठ नागरिकही असल्याने आपणा सर्वाची भूमिका मार्गदर्शकाची असावी, अशी अपेक्षा ढिकले यांनी व्यक्त केली. भूत, भविष्यकाळ विसरून वर्तमानाचा विचार करून सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आपले या वयातील संघटना प्रेम पाहून खूप आनंद वाटत असल्याचे सांगत त्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना चिमटा काढला. प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी निवृत्तांचा एकही प्रश्न आपण प्रलंबित ठेवणार नाही अशी ग्वाही देतानाच निवृत्तांनी त्यांच्या अनुभवाचा शिक्षण मंडळाला लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले.
मेळाव्यास उपमहापौर गुरूमित बग्गा, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले हेही उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष नथुजी देवरे यांनी केले. सूत्रसंचालन हिरालाल परदेशी यांनी केले. आभार उत्तम देवरे यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2014 रोजी प्रकाशित
मेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षकांना खूष करण्याचा प्रयत्न
सेवानिवृत्त प्राथनिक शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची पुन्हा एकदा ग्वाही आणि सेवानिवृत्त शिक्षकांचे समाजातील महत्व मांडतानाच त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत
First published on: 11-11-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news