सौर उर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सोलर एनर्जी’ या मासिकात येथील प्रसाद ठाकूर यांचा ‘सोलर सेल’ विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. सौर उर्जेसंदर्भात संशोधन करणाऱ्या जगभरातील संशोधकांमध्ये हे मासिक प्रसिद्ध आहे.
‘सोलर एनर्जी’ हे ‘इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटी’ चे अधिकृत मासिक असून त्यात जगभरातील महत्वपूर्ण संशोधनाची माहिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होत असतात. या मासिकाची ९६ वी आवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध होत असून, या आवृत्तीमध्ये या शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. या शोधनिबंधामध्ये कमी किंमतीच्या व उच्च कार्यक्षमता असलेल्या ‘सोलर सेल’च्या रचनेविषयी माहिती देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
नाशिकच्या युवकाचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकात
सौर उर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सोलर एनर्जी’ या मासिकात येथील प्रसाद ठाकूर यांचा ‘सोलर सेल’ विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे.
First published on: 28-09-2013 at 07:23 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik young boys essay in international magazine