महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे नुकतेच कर्करोगामुळे लीलावती रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते अनंत सुतार यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. या वेळी सभागृह नेते अनंत सुतार, विरोधी पक्ष नेता सरोज पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, महापौर सागर नाईक यांनी प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरण घेण्यामध्ये आर.आर.पाटील यांचे मोठा सहकार्य होते, असे महापौर सागर नाईक या वेळी म्हणाले. तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छताचा पुरस्कार हा आर.आर.पाटील यांच्यामुळेच मिळाला असल्याची आठवण करून दिली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2015 रोजी प्रकाशित
महानगरपालिकेत आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे नुकतेच कर्करोगामुळे लीलावती रुग्णालयात निधन झाले आहे.
First published on: 21-02-2015 at 12:20 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation tribute to rr patil