जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.
निर्मल भारत अभियानांतर्गत सन २०११ मध्ये या १३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात परभणी तालुक्यातील जलालपूर, जिंतूर तालुक्यातील सोन्ना, गणंतूर, बोर्डी, सेलू तालुक्यातील कुडा, वाकी, सिराळा, सोनपेठ तालुक्यातील शिरोरी, गंगाखेड तालुक्यातील मुळी, मानवत तालुक्यातील सावरगाव, नरळद व पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी या गावांचा यात समावेश आहे. निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ९६ ग्रामपंचायती आजतागायत निर्मल झाल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2013 रोजी प्रकाशित
परभणीत १३ पंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर
जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.
First published on: 23-08-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmal gram award declared to 13 panchayat in parbhani