डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जिंतूर तालुक्यातील जांब येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयातर्फे ग्रंथालय संचानालयाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. मुंबईतील शाहीर अमरशेख सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार भाऊसाहेब कांबळे, ग्रंथालय संचालक डॉ. बी. ए. सनान्से, उच्च व तंत्र शिक्षण विभाग उपसचिव श्रीमती तारगे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश जनबंदी, माजी आमदार गंगाधर पटने यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. रोख १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2013 रोजी प्रकाशित
ग्रंथमित्र पुरस्काराने पिंपळकर सन्मानित
डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जिंतूर तालुक्यातील जांब येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर यांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आला.

First published on: 15-09-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpalkar honoured to granthamitra award