नातेवाईकांसोबत चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबमधील अमृतसर येथील चार तरुणांना नागरिकांनी बदडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही तरुणांना अटक केली. मुरंदरजीत सरदार वेलसिंग भट्टी (१९), हरमनदीप तुलबीसिंग (२०), दीपकमल प्रल्हादसिंग अडवास (२०), अनिलकुमार रमेशकुमार वाटीका (२२) अशी आरोपींची नावे असून ते पंजाब प्रांतातील अमृतसर शहरातील रहिवासी आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास एक ३६ वर्षीय महिला नातेवाईकांसोबत सिनेमॅक्स इंटरनिटी मॉलमध्ये चित्रपट बघावयास गेली होती. यावेळी आरोपी मुरंदरजीतने त्या महिलेला ‘आय लव्ह यू’ म्हटले तर दीपकमलने त्या महिलेचा हात धरून छेड काढली. हा प्रकार लक्षात येताच या महिलेच्या बहीण जावयाने आरोपींना अटकाव केला, तेव्हा चारही आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. खरा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी चारही आरोपींना चांगलेच बदडून काढले व नंतर त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2014 रोजी प्रकाशित
महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबच्या तरुणांना अटक
नातेवाईकांसोबत चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबमधील अमृतसर येथील चार तरुणांना नागरिकांनी बदडून पोलिसांच्या हवाली केले.
First published on: 19-03-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab youth arrested for molesting woman