एड्स जनजागृतीचे सर्वव्यापी कार्य समाजप्रबोधनाचा भाग असून रेडक्रॉसच्या वतीने गेली पाच वर्ष ते सक्षमपणे पेलले आहे. एच.आय.व्ही.-एड्सबद्दलचे समाजामध्ये असणारे गैरसमज दूर करण्यात महत्त्वाचा पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रकल्प समन्वयक मोहन सातपुते यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा कांबळे होत्या.
कोल्हापूर प्रेस क्लब, यूथ पिअर एज्युकेशन प्रोग्रॅम, इंद्रधनू बहुउद्देशीय जनसेवा संस्था, तिसंगी यांच्या वतीने एड्स जनजागृती सप्ताहाच्या सांगता समारंभप्रसंगी तिसंगी (ता. पन्हाळा) येथील मोहिते-पाटील ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी डॉ. गुरुप्रसाद जाधव, विस्तार अधिकारी बी. बी. सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, अमोल वादी, विक्रम राजवर्धन, सागर िशदे, सागर कांबळे, युवा नेते स्वप्नील िशदे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्था सचिव श्रीनिवास मालू, अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, प्रेस क्बलच्या अध्यक्षा अनुराधा कदम, उपाध्यक्ष ताज मुल्लाणी, उमाकांत नलवडे, श्रद्धा जोगळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक इंद्रधनूचे अध्यक्ष सर्जेराव खाडे यांनी केले.