मराठी रूपेरी पडद्यावर कौटुंबिक चित्रपटांचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे, अशा चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच भरभरून दाद मिळत आली आहे. पती-पत्नी नात्यातील प्रेमसंबंध, ताणतणाव मांडण्याचे धाडस अलीकडे मराठी चित्रपटांमधून केले जात आहे. या पाश्र्वभूमीवर ‘ऐश्वर्या आर्ट्स अॅण्ड फिल्म्स’ बॅनरखाली निर्माते राजेश भरणे हे  ‘कुठं बोलू नका’ हा धमाल कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. पती-पत्नी हळूवार नातेसंबंधावर भाष्य करणारा हा मराठी चित्रपट येत्या ११ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.    
अशोक कार्लेकर आणि राजन प्रमुख दिग्दर्शित ‘कुठं बोलू नका’ या चित्रपटात प्रसाद ओक, लता अंधारे, अंजली खान्तवाल, दीपक शिर्के, विजय गोखळे, किशोर नांदलस्कर, सुहासिनी देशपांडे, राजन प्रभू, किरण रोंगे, संतोष सातव, मेघा पाठक, अनिल नगरकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. रामदास भोसले चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.