भ्रष्टाचारमुक्त आरटीओ कार्यालय फतव्यानंतर वाशी येथील आरटीओ कार्यालयाबाहेर पदपथावरील दलालांची वर्दळ शमलेली होती. ऑनलाइन प्रक्रिया याबाबत तसूभरही माहिती नसल्याने हैराण झालेल्या नागरिकांकडून आरटीओ कार्यालयात अनेक प्रश्नांचा भडिमार सुरू होता. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे चेहरे लालबुंद झाले होते.
वाशी येथील आरटीओ कार्यालय परिसरात कार्यरत असणारे एजंट काम बंद आंदोलनामुळे सकाळपासूनच दिसेनासे झाले होते, तर अनेक फोन आणि येणाऱ्या नागरिकांना बाहेरच्या बाहेरच थेट आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज भरण्याचे सूचित करीत होते. वाशी येथील कार्यालयात आलेल्या प्रत्येक नागरिकाला एजंट नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अर्ज भरायचा कसा इथपासून ते परवाना चलन भरण्यापर्यंतच्या प्रत्येक खिडकीवर भटकंती करावी लागली. तितके करूनही हाती काही न लागलेल्या नागरिकांनी बंददरम्यान थेट घरी जाण्याचे पसंत केले. तर अनेक एजंटांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असून याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युनियनच्या माध्यमातून आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2015 रोजी प्रकाशित
आरटीओ परिसरात शुकशुकाट, कार्यालयात चिडचिड
भ्रष्टाचारमुक्त आरटीओ कार्यालय फतव्यानंतर वाशी येथील आरटीओ कार्यालयाबाहेर पदपथावरील दलालांची वर्दळ शमलेली होती.
First published on: 21-01-2015 at 07:01 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rto shuts door for agents finally