होळीनिमित्त कोकणातील शिन्दी भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन एस.टी.च्या ठाणे विभागातर्फे रविवार २४ मार्च पासून ठाणे ते शिन्दी अशी बससेवा सरू करण्यात येणार आहे. एसटीच्या ठाण्यातील खोपट स्थानकातून या गाडय़ा सुटणार आहेत. आरक्षण केंद्रावर या गाडय़ांचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे. खोपट येथील मध्यवर्ती स्थानकातून रात्री ९.३० वाजता ही गाडी सुटणार आहे. ठाणे-महाड खेडमार्गे ही गाडी धावणार असून वेरळ, सवेनी, हेदली, कुळवंडी, तिसंगीफाटा, बीजघर, खोपी, शिरगाव आणि शिन्दी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बससेवेचा फायदा होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2013 रोजी प्रकाशित
होळीनिमित्त ठाणे ते शिंदी एसटीच्या गाडय़ा
होळीनिमित्त कोकणातील शिन्दी भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन एस.टी.च्या ठाणे विभागातर्फे रविवार २४ मार्च पासून ठाणे ते शिन्दी अशी बससेवा सरू करण्यात येणार आहे. एसटीच्या ठाण्यातील खोपट स्थानकातून या गाडय़ा सुटणार आहेत. आरक्षण केंद्रावर या गाडय़ांचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.
First published on: 21-03-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane to shindi st buses on the occasion of holi