‘धि गोवा हिंदू असोसिएशन’तर्फे नवोदित गोमांतकीय साहित्यिकास देण्यात येणाऱ्या बा. भ. बोरकर आणि प्रा. जी. ए. कुलकर्णी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह आणि अनुक्रमे रोख १५ हजार व ११ हजार १११ रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पणजी-गोवा येथील राधा भावे यांना बोरकर पुरस्कार तर डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत जी. ए. कुलकर्णी पुरस्कार गोहाटी-आसाम येथील विद्या शर्मा यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ येत्या १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोमंतधाम, डॉ. भडकमकर मार्ग, येथे आयोजित करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2013 रोजी प्रकाशित
धि गोवा हिंदू असोसिएशनचे साहित्य पुरस्कार जाहीर
‘धि गोवा हिंदू असोसिएशन’तर्फे नवोदित गोमांतकीय साहित्यिकास देण्यात येणाऱ्या बा. भ. बोरकर आणि प्रा. जी. ए. कुलकर्णी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
First published on: 14-11-2013 at 06:21 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The goa hindu association literary award announced