दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीचे ग्रामदैवत हजरत दावल मलिकसाहेबांच्या ऊर्स महोत्सवाला प्रारंभ झाला असून, उद्या शुक्रवारी ऊर्समधील ‘चिरागा’ (दीपोत्सव) हा मुख्य कार्यक्रम आहे. त्यानिमित्त दर्गाह परिसरात जत्रा भरणार आहे.
गुरुवारी सायंकाळी ‘संदल’चा धार्मिक कार्यक्रम झाला. बाबांच्या पवित्र समाधीवर चंदनाचा लेप देऊन फुलांची चादर अर्पण करण्यात आली. नंतर फातेहाखानीचा विधी पार पडला. उद्या ऊर्सचा मुख्य कार्यक्रम असून त्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून हजारो भाविक बोरामणीत दाखल होणार आहेत. बोरामणीपासून चार किलो मीटर अंतरावर दावल मलिकबाबांचा प्रसिद्ध दर्गाह आहे. हिंदू-मुस्लिमांसह अठरा पगड जातींचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून दावल मलिकबाबांचा दर्गाह प्रसिद्ध आहे. ऊर्सनिमित्त दर्गाह परिसरात टँकरद्वारे पाण्याची सोय करण्यात आल्याचे दर्गाहचे प्रमुख बशीर मुजावर यांनी सांगितले. शनिवारी, तिसऱ्या दिवशी सकाळी जियारत व दुपारी कुस्त्यांचा फड होऊन ऊर्स महोत्सवाची सांगता होणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2012 रोजी प्रकाशित
दावल मलिक ऊर्सनिमित्त आज बोरामणीत जत्रा
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीचे ग्रामदैवत हजरत दावल मलिकसाहेबांच्या ऊर्स महोत्सवाला प्रारंभ झाला असून, उद्या शुक्रवारी ऊर्समधील ‘चिरागा’ (दीपोत्सव) हा मुख्य कार्यक्रम आहे. त्यानिमित्त दर्गाह परिसरात जत्रा भरणार आहे.
First published on: 27-12-2012 at 08:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today fair in boramani due to daval malik urus