पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. वज्रेश्वरी झोपडपट्टीजवळ पाटात सायकल धूत असताना ऋषीकेश जिभाऊ जाधव (२०) हा युवक पाण्यात पडला. पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसरी घटना गोदावरी नदीपात्रात घडली. लक्ष्मीनारायण मंदिराच्या मागील बाजूस गोदावरी पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.
या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळविली. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या दोन्ही घटनांबद्दल पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.