शहर व परिसरात गेल्या चोवीस तासांत घडलेल्या रस्ते अपघातात दोघा तरुणांचा बळी गेला. यातील एका तरुणाचा आपल्या आईला देवदर्शनासाठी एसटी बसमध्ये बसवून घरी परत येताना वाटेत कर्नाटक एसटी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर दुसरा अपघाती मृत्यू रिक्षाचालकाचा असून त्यास अज्ञात वाहनाची धडक बसली.
बसवराज शिवप्पा आंडगे-पाटील (वय २८, रा. किसाननगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याची आई सरूबाई हिला येरमाळ्यातील येडेश्वरीदेवीच्या दर्शनासाठी जायचे होते. बसवराज याने तिला एसटी बसस्थाकनात येऊन एसटी बसमध्ये बसविले. नंतर तो घराकडे निघाला असता वाटेत हैदराबाद मार्गावर शहराच्या हद्दीत मुळेगाव रस्त्यावर त्याच्या मोटारसायकलला कर्नाटक एसटी बसने धडक दिली. यात तो जागीच मृत्युमुखी पडला. त्याचा विवाह अवघ्या वर्षांपूर्वीच झाला होता. तो एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीत वाहनचालक म्हणून सेवेत होता.
दुसरा अपघात
अशोक चौकाजवळ वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसमोर एका अज्ञात वाहनाची धडक बसून घडलेल्या अपघातात पिंटू ऊर्फ मारुती पांडुरंग यादव (वय २५, रा. जुना बोरामणी नाका) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. मध्यरात्री तो पायी एकटाच चालत शांती चौकातून व्हिव्हको प्रोसेसच्या दिशेने निघाला होता. अज्ञात वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने पिंटू हा जागीच मरण पावला. जेलरोड पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
सोलापुरात दोन रस्ते अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू
शहर व परिसरात गेल्या चोवीस तासांत घडलेल्या रस्ते अपघातात दोघा तरुणांचा बळी गेला. यातील एका तरुणाचा आपल्या आईला देवदर्शनासाठी एसटी बसमध्ये बसवून घरी परत येताना वाटेत कर्नाटक एसटी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर दुसरा अपघाती मृत्यू रिक्षाचालकाचा असून त्यास अज्ञात वाहनाची धडक बसली.
First published on: 28-11-2012 at 10:09 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed in road accident