मध्यरात्रीच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहत आणि आडगाव शिवारात भक्तीधाम अपार्टमेंट परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांच्या दोन टोळ्यांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यामध्ये आठ संशयित दरोडेखोरांचा समावेश असून त्यांच्याकडून दरोडय़ासाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मध्यरात्री पोलिसांची गस्त सुरू असताना हे संशयित वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या हाती लागले. अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस रस्त्यावर दोन मोटार सायकलवरून हे संशयित दरोडे टाकण्यासाठी निघाले होते. संबंधितांना पोलिसांनी हटकून झडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार व इतर साहित्य आढळून आले. जीवन तुकाराम धनगर, सुनील अप्पा जाधव व सुनील लक्ष्मण पाटील यांना पोलिसांनी अटक केली. या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दरोडेखोरांची दुसरी टोळी आडगाव शिवारातील भक्तीधाम अपार्टमेंट समोरील अरुंद रस्त्यावर जेरबंद करण्यात आली. लोखंडी कटावणी, लाकडी दांडा व मिरचीची पुड घेऊन हे संशयित दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघाले होते. संबंधितांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणी शाहरूख शहा रफीक, अशरफ शहा रफीक, मदन मनोज वाघ, प्रकाश बेंडकुळे व जब्बार खान (सर्व रा. भारतनगर व वडाळागाव) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
संशयित दरोडेखोरांच्या दोन टोळ्या जेरबंद
मध्यरात्रीच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहत आणि आडगाव शिवारात भक्तीधाम अपार्टमेंट परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांच्या
First published on: 18-01-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two suspect gangs of robber arrested