जेएनपीटी तसेच उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीत वाढ होत आहे. उरण तालुक्यात जागतिक दर्जाचे जेएनपीटी बंदर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ओ.एन.जी.सी., वायू विद्युत केंद्र तसेच प्रस्तावित नवी मुंबई सेझ व जेएनपीटी सेझसह चौथे व पाचवे बंदर यामुळे वाहनांची संख्या अधिक वाढणार असल्याने तालुक्याला जोडणाऱ्या जेएनपीटी ते पळस्पे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब आणि उरण ते पामबीच मार्ग राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही मार्गाचे रुंदीकरण करून ते आठपदरी करण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कामासाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. जेएनपीटी बंदरातील कंटेनर हाताळणीची क्षमता दिवसेंदिवस वाढत असून येत्या काही वर्षांत ती दुपटीपेक्षाही अधिक होऊन ती एक कोटीपर्यंत वाढणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
उरणमधील राज्य व राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी होणार
जेएनपीटी तसेच उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या परिसरातील वाहतुकीत वाढ होत आहे
First published on: 26-03-2014 at 09:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran state and national highways now eight door