ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरातील विंधनविहीर व बारव विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. शहरामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासणार आहे. या पाश्र्वभूमीवर देवस्थान परिसरातील पाण्याचा उपयोग लातूर शहरासाठी करण्याची सूचना देवस्थानचे विश्वस्त आमदार दिलीपराव देशमुख यांनी केली.
सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थानचे विश्वस्त आमदार देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
आमदार देशमुख यांनी देवस्थान परिसरातील उपलब्ध पाणी लातूरकरांना उपलब्ध करण्याची सूचना केली. सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची बारव विहीर स्वच्छ करून घ्यावी. विंधनविहिरीचे पाणी बारव विहिरीत सोडावे व तेथून टँकरने पाणी उचलून लातूरकरांना पुरवठा करावा, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे, असे प्रदीप राठी यांनी सांगितले.
देवस्थानचे अध्यक्ष गोजमगुंडे यांनी सिद्धेश्वर देवस्थान परिसरातील पाण्याच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. शहरातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, नागरी बँकांनी, सहकारी संस्थांनी, साखर कारखान्यांनी, बाजार समितीने लातूरकरांना मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2013 रोजी प्रकाशित
‘सिद्धेश्वर देवस्थानमार्फत लातूर शहराला पाणी द्यावे’
ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरातील विंधनविहीर व बारव विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. शहरामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासणार आहे. या पाश्र्वभूमीवर देवस्थान परिसरातील पाण्याचा उपयोग लातूर शहरासाठी करण्याची सूचना देवस्थानचे विश्वस्त आमदार दिलीपराव देशमुख यांनी केली.
First published on: 31-01-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water should be provide to latur city from siddheshver trust