महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने उमरेड मार्गावरील चिटणीसनगरातील ललित कला भवनात कामगारांकरिता विधि साक्षरता शिबीर व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य प्रमोद मोहोड व कामगार न्यायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश मेघे, अॅड. डी.एन. माथूर उपस्थित होते. कामगार कल्याण अधिकारी अरुण कापसे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मेघे यांनी कामगारांना विधि सेवा उपसमिती व प्राधिकरण यांच्यातर्फे मोफत कायदेविषयी माहिती देण्याचे आवाहन केले. माथूर यांनी किमान वेतन कायदा, नुकसान भरपाई आणि औद्योगिक कायद्यांचा परिचय करून दिला. यावेळी कामगार नेते विजय डेवीड, प्रमोद काळे, राजेश गोरले आणि इतर नेत्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. मोहोड यांनी सध्याच्या परिस्थितीत कामगार असंघटित असून त्यांना कामगार नेत्यांनी संघटित करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता काम करावे, असे आवाहन केले.
कोराडीचे गोपाळ गायधने, वसंतनगरचे भोला शर्मा, विनोद धारगावे आणि अनिता सुनील दंडलवार, हिंगण्याचे रवींद्र भीमराव ताकसांडे आणि कळमेश्वरचे प्रफुल्ल महादेव गावंडे यांना प्रत्येकी २५ हजारांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. संचालन केंद्राचे संचालक सुधर्मा खोडे यांनी केले तर सचिन वंजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गंगाधर नागपुरे, प्रतिभा पागघुणे, सतीश कुटे आणि नंदा माळोदे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
कामगार मेळावा, विधि साक्षरता शिबीराचे आयोजन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने उमरेड मार्गावरील चिटणीसनगरातील ललित कला भवनात कामगारांकरिता विधि साक्षरता शिबीर व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
First published on: 08-05-2015 at 07:51 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers gathering