News Flash

कोणती कार घेऊ?

काही अ‍ॅक्सेसरीज तुम्ही बाहेरून लावू शकत नाहीत.

| December 9, 2016 12:59 am

* माझे बजेट सहा ते सात लाख आहे. मला बलेनो कार आवडते. बलेनोचे . सिग्मा किंवा . डेल्टा घ्यावी या बाबतीत द्विधा मन:स्थितीत आहे. . डेल्टा घेतल्यास रिअर पार्किंग कॅमेरा नाही किंमत जास्त आहे. त्यापेक्षा . सिग्मा घेऊन त्यामध्ये बाहेरील ॅक्सेसरिज, रिअर पाìकग कॅमेरा, म्युझिक सिस्टीम, रिमोट लॉक टाकल्यास योग्य राहील का? माझे साप्ताहिक ड्रायिव्हग किमान २०० ते ३०० किमीचे असते आणि दोन महिन्यांतून एकदा गावी जाणे होते. गावी जाण्यासठी १००० किमीचा प्रवास आहे . त्यासठी डिझेल गाडी घेण्याचापण विचार करतोय. योग्य पर्याय सुचवा.

बद्रीनाथ ढाकणे, सातारा

* होय तुम्ही सिग्मा मॉडेल घेऊ शकता ; पण काही अ‍ॅक्सेसरीज तुम्ही बाहेरून लावू शकत नाहीत. जसे की रिअर पॉवर िवडोज, हेड रेस्ट इत्यादी.

 

* माझे बजेट साडेसात लाख रुपये आहे. आणि रिनग दरमहा एक हजार किमीचे आहे. तरी मला पुढीलपकी कोणती गाडी घ्यावी, याचा सल्ला द्यावा.. शेवरोले सेल, ुंदाई आय २० ुंदाई एक्सेंट, फोक्सवॅगन ॅमिओ, फोर्ड अस्पायर. किंवा तुम्ही सुचवा..

पार्थ साक्रीकर

* मी तुम्हाला फोक्सवॅगन पोलो घ्यायचा सल्ला देईन. तुम्ही साडेसात लाखांत टॉप मॉडेल पोलो घ्या. यात तुम्हाला एअरबॅग्ज तर मिळतीलच शिवाय सेफ्टी आणि कम्फर्टसाठीही ही गाडी उत्तम आहे.

 

* मी असं ऐकले आहे की, टाटाच्या गाडय़ांना मेन्टेनन्स खूप लागतो. मला टाटांची टियागो ही गाडी घ्यायची आहे आणि मी टाटांच्या काइट या गाडीची प्रतीक्षाही करतो आहे. मी नक्की काय करावं.

हेमंत चौधरी

* फार पूर्वी टाटांच्या गाडय़ांचा मेन्टेनन्सचा प्रॉब्लेम होताच. मात्र, आताशा हा त्रास कमी झाला आहे. आताच्या टाटांच्या गाडय़ा चांगल्या आहेत. त्यांचे इंजिनही रिफाइण्ड असते आणि त्या जास्त स्टर्डीही असतात. सस्पेन्शनही चांगले असते. तुमच्यासाठी टियागो डिझेल चांगली ठरेल. कारण ही गाडी २३ किमी प्रति लिटर एवढा मायलेज देते.

 

* आमच्याकडे स्कॉíपओचे २००५चे एसएलएक्स मॉडेल आहे त्या बदल्यात आम्ही एक्सयूव्ही५०० डब्ल्यू८२०१३ ची गाडी घेतली आहे. तरी घेतलेला निर्णय योग्य आहे का ते सांगा.

कुशाग्र जाधव

* तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे परंतु एक्सयूव्ही५०० ही मिहद्राची गाडी आहे आणि ती घेताना तिची कंडिशन चांगली असेल तर बरंच आहे. मात्र, सात-आठ वर्षांनी मिहद्राच्या गाडय़ा इंजिनात मेन्टेनन्स काढतात.

 

* मी दोन वष्रे जुनी टाटा ग्रॅण्ड डायकॉर घेतली आहे. फक्त ३८००० किमी चाललेली गाडी उत्तम स्थितीत आहे. गाडीला जुन्या प्रकारचे लीफ िस्प्रग सस्पेन्शनआहे. ते बदलून मी कॉईल िस्प्रग सस्पेन्शनकरू शकतो का? करावे का? बॉडी रोलवरही काही चांगला परिणाम होईल का?

डॉ हृषीकेश कालगांवकर, सावेडी, अहमदनगर

* टाटा ग्रॅण्ड ही गाडी अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी बनविण्यात आली आहे. म्हणून तिला लीफ िस्प्रग सस्पेन्शन आहेत. तुम्ही दोन-तीन जण जाणार असाल या गाडीतून तर गाडी बॉडी जिम्पग आणि रोल होणारच. त्यासाठी तुम्ही कॉइल िस्प्रग सस्पेन्शन नाही लावू शकत. तिची रचना वेगळी आहे.

 

* मला गाडी घ्यायची असून माझे बजेट साधारणत: दहाबारा लाख रुपये आहे. आमच्या कुटुंबात आम्ही सात जण आहोत. माझे दरमहा किमान दीड ते दोन हजार किमी ड्रायिव्हग होते. मला कुटुंबाबरोबरच शेतीकामासाठीही उपयुक्त होईल, अशी गाडी घ्यायची आहे. कृपया मला चांगली गाडी सुचवा.

मििलद नितनवरे

* तुमच्या एकंदर मासिक ड्रायिव्हगचा विचार करता तुमच्यासाठी डिझेल स्कॉíपओ चांगली ठरेल. मात्र, तुम्हाला या गाडीपेक्षाही अधिक चांगला मायलेज देणारी गाडी हवी असेल तर तुम्ही रेनॉ लॉजी किंवा टीयूव्ही ३०० यांपकी एकाचा विचार करा.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 12:59 am

Web Title: loksatta advised in which car to buy
Next Stories
1 न्युट्रल व्ह्य़ू : हॅचबॅक क्रॉसओव्हरच का?
2 टेस्ट ड्राइव्ह : आवडीची ‘ऑडी’
3 कोणती कार घेऊ?
Just Now!
X