scorecardresearch

गच्चीवरची बाग फुलवणारा पालापाचोळा

वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास फायदेशीर ठरते. हा पालापाचोळा विविध पद्धतीने वापरता येतो.

terrace gardening
गच्चीवरच्या बागेसाठी गच्चीवरच खतनिर्मितीही करता येते.

संदीप चव्हाण

झाडांचा पालापाचोळा जो अगदी सहज उपलब्ध होतो, त्याचाही मोठय़ा प्रमाणावर खतनिर्मितीसाठी उपयोग करता येतो. अनेकदा पालापाचोळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळला जातो, त्यामुळे हवेचे प्रदूषण तर होतेच, शिवाय तापमानवाढीत त्यामुळे भर पडते. खरे तर पालापाचोळा हा झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. त्यातून मोठ्य़ा प्रमाणात झाडांना नत्र पुरवठा होतो, पण त्यासोबत इतर अनेक सूक्ष्म घटकही मिळतात.

आणखी वाचा : लग्नानंतर वर्षभरातच नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर “तूच पांढऱ्या पायाची” म्हणणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती की…

मात्र बागेत कुंड्या भरण्यासाठी पालापाचोळा वापरताना तो सुकवलेलाच वापरावा. कारण ओल्या कचऱ्यात उष्णता असते. त्याचे खत तयार होताना उष्णता बाहेर पडते व त्यातून झाडांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. एखाद्या चौकोनी जाळीत ओला पालापाचोळा संग्रहित करून ठेवावा म्हणजे त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन तो लवकर सुकतो. कुंडीच्या भरणपोषणासाठी पालापाचोळ्यात जितकी विविधता असेल तेवढी उत्तम. म्हणजे बागेतील कुंड्य़ांतील झाडांना विविध प्रकारची सूक्ष्म जीवनसत्त्वं निरंतर मिळत राहतात. त्यातून पिकवलेला भाजीपालाही चांगला चवदार व पोषक तयार होतो. बदाम, निलगिरी, काजू, शेवगा, शेवरी, आंबा, जंगली झाडे- अशा कोणत्याही उपयोगी, निरुपयोगी झाडांचा पालापाचोळा उपयोगात आणता येतो.

आणखी वाचा : मुलांचं जननेंद्रिय हाताळणं आणि पालकांचं रागावणं

रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. आपल्या बागेत, बंगल्याच्या आवारात, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरतात. हा पालापाचोळा विविध पद्धतीने वापरता येतो. पालपाचोळा कुंड्या, वाफे यांत भरणपोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तसेच हा पालापाचोळा एखाद्या तागाच्या गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवावा. त्यावर पाणी देत जावे, ऊन-वारा-पाऊस यांमुळे चांगले कंपोस्टिंग स्वरूपातले खत तयार होते. हा सुकलेला पालापाचोळा अर्धवट कुजला तरी तो खत म्हणून वापरण्यास योग्य असतो.ड्रमचा वापरएखाद्या ड्रमला तळाशी भोक पाडून त्या ड्रममध्ये पालापाचोळा व रोज पाच लिटर पाणी टाकत गेल्यास पाच महिन्यांत कंपोस्ट झालेले खत मिळते. शिवाय ड्रममधून निचरा झालेले पाणीसुद्धा झाडांना ह्य़ुमिक ॲसिडच्या रूपात वापरता येते.

आणखी वाचा : सनटॅन? विसरून जा…

सिमेंटचा हौद

अपार्टमेंट, वाडी व घराच्या आवारात पालापाचोळ्यापासून खत बनवण्यासाठी हौद साकारता येतो. यात सुरुवातीला एक इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर एकेरी अथवा दुहेरी विटांचा जाळीदार हौद तयार करावा अथवा सिमेंटच्या मदतीने बांधून घ्यावा. याची उंची तीन फुटांपेक्षा अधिक नसावी. सिमेंट न वापरताही फक्त विटा सांधे पद्धतीने रचूनही हौद तयार करता येतो. विटा रचून केलेला हौद नेहमी चांगला म्हणजे खत काढताना विटा चारही बाजूने काढून घेता येतात. संपूर्ण खत फावड्याने वर खाली चाळून ते संपूर्ण बाजूलाही करता येते. यात गांडुळेही सोडता येतात. तसेच उंदीर, घुशीचा त्रास नसेल तर हिरवा ओला कचरा व खरकटे अन्नही जिरवता येते. अधूनमधून त्यावर शेणपाणी शिंपडल्यास उत्तम.
sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:33 IST

संबंधित बातम्या