महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तसेच या खेळाडूला एम. एस. धोनी या नावाने जास्त ओळखले जाते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी महेंद्रसिंग धोनीने सिनेसृष्टीत पदार्पण करीत स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस २०१९ मध्ये सुरू केले. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेड’ असे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेडने रमेश थमिलमनी दिग्दर्शित ‘लेट्स गेट मॅरीड’ (LGM) या पहिल्या तमीळ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले होते.

धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेड या प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापन महेंद्रसिंग धोनीच्या सासू शीला सिंग पाहतात. हे प्रॉडक्शन हाऊस कोट्यवधींचा व्यवसाय करते. धोनीची केवळ सासूच नाही, तर त्याची पत्नी साक्षी धोनीही या व्यवसायास हातभार लावते आहे. २०२० पासून या दोघी मायलेकी या प्रॉडक्शन हाऊसचे नेतृत्व करीत आहेत. या दोघींच्या नेतृत्वाखाली एम. एस धोनीचे प्रॉडक्शन हाऊसने मोठे यश मिळवीत कंपनीने मोठी झेप घेतली आहे. तेव्हापासून शीला सिंग या कंपनीच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत (सीईओ) आहेत.

हेही वाचा…एकेकाळी ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम; आज अमेरीकेतील अब्जाधीश कंपनीच्या सीईओ

खास गोष्ट अशी की, कंपनीच्या प्रमुख म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या सासू शीला सिंग यांचा हा पहिलाच उपक्रम आहे. महेंद्रसिंग धोनीच्या सासू आणि पत्नी साक्षीच्या नेतृत्वाखाली केवळ चार वर्षांत या कंपनीने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि नवीन प्रकल्पसुद्धा जारी केले आहेत. मायलेकीच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या प्रॉडक्शन हाऊसची एकूण संपत्ती ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. धोनीने व्यवसायाच्या विस्तार करण्याचा विचार करीत कुटुंबातील सदस्यांवर अधिक विश्वास दाखवला आणि आपल्या सासूवर एक मोठी जबाबदारी सोपवली. शीला सिंग २०२० पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शीला सिंग यांचे पती आर. के. सिंग हे एम. एस. धोनीचे वडील पानसिंग धोनी यांच्यासोबत कनोई ग्रुपच्या ‘बिनागुरी टी कंपनी’मध्ये त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात काम करायचे. तेव्हा शीला सिंग या गृहिणी होत्या आणि त्यांनी घर व मुलांची काळजी घेतली आणि आता त्या प्रॉडक्शन हाऊस धोनी एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच वर्षाच्या सुरुवातीला तयार झाला धोनी एंटरटेन्मेंट लिमिटेडचा पहिला ‘लेट्स गेट मॅरीड’ हा तमीळ चित्रपट आहे; जे ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video)सारख्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.