नागीण, विसर्प, धावरे अशा विविध नावाने हा रोग ओळखला जाते. कपाळावर, मानेवार, हात,  पाय, छाती-पोटावर कुठेही नागीण होते व पसरत जाते. सुरुवातीला त्वचेवर लालपणा, नंतर भयंकर खाज, आग किंवा वेदना होऊन पाण्याने भरलेले पुंजक्यासारखे फोड येतात. पित्तदोषाचा प्रकोप, त्यामुळे वाढलेली उष्णता आणि बाहेरचे उष्ण किंवा अचानक बदलणारे हवामान तसेच कांजिण्याच्या जातीच्या विषाणू संसर्गामुळे नागीण होते.

  • नागिणीने जानव्यासारखे वर्तुळ पूर्ण केले तर माणूस मरतो. या भ्रमातून सर्व वाचकांनी आजपासून कायमचे मुक्त व्हावे!’
  • पांढरे किंवा लाल चंदन पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचा नागिणीच्या जागेवर सतत लेप देत राहावा.
  • खूप वेदना होत असतील तर फोडांच्या बाजूने दशांग लेप गरम पाण्या कालवून त्याचा लेप द्यावा. खूप आग होत असेल तर बाजूने बर्फाने, तर खाज खूप येत असेल तर बाजूने गरम पाण्यात रूमाल भिजवून त्याचा लेप द्यावा.

-सर्व नागिणींवर ‘शतघोत घृत’, ‘दुर्वाचा रस’ किंवा शुद्ध केलेल्या ‘गेरूच्या मातीचा लेप’ जादूप्रमाणे काम करतात.

– वैद्य राजीव कानिटकर