झाडीबोली साहित्याचा अभ्यास करणारी किंवा त्यात तज्ज्ञ असलेली मंडळी ग्रामीण भागात असली तरी प्रस्थापितांमुळे अनेक वर्षे ती विस्थापित राहिली आहे. मात्र, गेल्या काही वषार्ंत झाडीबोली साहित्याची मोठय़ा प्रमाणात निर्मिती करण्यात आल्यामुळे या साहित्याला चांगले दिवस येऊ लागले असताना त्याचे श्रेय अंजनाबाई यांच्या साहित्यकृतीला दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी व्यक्त केले.

विवेक प्रकाशनच्या वतीने विदर्भाच्या बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनाबाई खुणे यांच्या गौरव ग्रंथ आणि झाडीकन्या-अंजनाबाइर्ंच्या कविता या दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक आणि वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला झाडीबोली साहित्य मंडळ व मराठी बोली साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, हिरामन लांजे, माजी विक्रीकर आयुक्त प्रकाश बाळबुधे, ज्येष्ठ कवी ना.गो. थुटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंजनाबाई खुणे आणि श्रीराम खुणे यांचा सत्कार करण्यात आला.

झोडीबोली साहित्यासोबत बोली भाषेचा प्रचार केला जात आहे. अनकांचे नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले. त्याकाळात वऱ्हाडी किंवा बोली भाषेत कविता लिहिणारे अनेकजण होते. मात्र ते समोर येऊ शकले नाही. अंजनाबाईंनी आज साहित्य चळवळ निर्माण केली असून अनेक युवक त्यांच्यापासून प्रेरणा घेत साहित्य क्षेत्राकडे वळले आहे त्यामुळे झाडीपट्टीच्या खऱ्या अर्थाने आयकॉन असल्याचे सांगत बोरकर यांनी त्यांचा गौरव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरीश गांधी म्हणाले, अंजनाबाइर्ंच्या कवितांमध्ये सामाजिक संदर्भ असल्यामुळे त्यांची ओळख ही विदर्भाच्या बहिणाबाई म्हणून झाली आहे. अंजनाबाई या केवळ झाडीपट्टीच्या राहिलेल्या नाही तर महाराष्ट्राच्या बहिणाबाई आहेत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्या जीवन जगल्या आहेत त्यांनी साहित्य निर्मिती केली. त्यामुळे त्यांना केवळ एका भागापुरती बंदित ठेवू नका. अंजनाबाईनी स्वतपुरता विचार केला नाही तर नवीन पिढी घडावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. ही झाडीबोली साहित्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असल्याचे गांधी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरामन लांजे यांनी तर संचालन वसंतराव चन्न्ो यांनी केले.