बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीत दोसांझला पाठिंबा देणारी पोस्ट डिलीट केली आहे. दिलजीतला पाकिस्तानी अभिनेत्रीच्या चित्रपटात काम केल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते. नसीरुद्दीन यांनी दिलजीतला पाठिंबा देत पोस्ट केली होती, परंतु त्यावर टीका झाल्याने त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. नवीन पोस्टमध्ये त्यांनी सत्याच्या बाजूने बोलणे कठीण असल्याचे म्हटले आहे.