scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
nitin gadkari latest marathi news
“पदरी पडलं, पवित्र झालं”, भाजपात येणाऱ्यांविषयी नितीन गडकरींचं विधान चर्चेत; म्हणाले, “जसे असतील तसे पक्षात घेऊन त्यांना…”

नितीन गडकरी म्हणतात, “इतर पक्षातील नेते जसे असतील तसं त्यांना घ्यायचं आणि इथे आल्यावर दुरुस्त करायचं!”

yavatmal uddhav thackeray speech marathi news
“भाजपचे हिंदुत्व थापेबाज, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू…”, उद्धव ठाकरे उमरखेडमध्ये कडाडले

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ‘भाडोत्री जनता पक्ष’ या शब्दांत टीका करून, भाजपला आपला नेता देशापेक्षा मोठा आहे, असे…

sushilkumar shinde praniti shinde
“प्रणिती शिंदेंना फोडण्यासाठी भाजपाने…”, सुशीलकुमार शिंदेंचा दावा; म्हणाले, “सोलापूर लोकसभेसाठी…”

प्रणिती शिंदे या यंदा सोलापूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. या चर्चेवर प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या उमेदवारीची…

Jalgaon , sharad pawar group ncp leader, Eknath Khadse, Criticizes BJP, BJP district President, slams, politics, maharashtra, lok sabha 2024,
जळगाव जिल्ह्यात भाजप – शरद पवार गटात वाक्युद्ध

दोन दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यात भाजपला कोणी विचारत नव्हते, त्यावेळी मी…

mp sanjay mandlik vs bjp dhananjay mahadik
कोल्हापुरात शिंदे गट – भाजप मधील तणाव वाढीस

खासदार संजय मंडलिक यांनी मलाच उमेदवारी मिळणार असा ठाम दावा सुरू केला असताना भाजपने मतदारसंघ पक्षाला मिळावा अशी मागणी कायम…

why vote in seven phases Bihar
बिहारमध्ये उत्तर प्रदेशपेक्षा निम्म्या जागा तरीही तिथे सात टप्प्यांत मतदान कशासाठी? विरोधकांचा सवाल

लांबलेल्या निवडणुकांमुळे एनडीएची अस्वस्थता दिसून आली आहे, ज्यात भाजपा, जेडी(यू), लोक जनशक्ती पक्षाचे दोन गट आणि इतर लहान पक्षांचा समावेश…

radhakrishna vikhe patil lok sabha marathi news, radhakrishna vikhe patil nagar lok sabha marathi news
पक्षाअंतर्गत विरोधकांशी संवाद साधण्याची विखे-पाटील यांना गरज का भासली ?

लागोपाठ घडलेल्या या घटना योगायोग निश्चितच नाही. ही चर्चा केवळ नगर मतदारसंघापूरतीच होती की विखे यांच्या कार्यपद्धतीचा फटका बसलेल्या इतर…

Pasupati Paras Resigns
भाजपाला बिहारमध्ये मोठा धक्का; केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा!

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, बिहारमध्ये भाजपाला मोठा धक्का, लोकसभेची एकही जागा मिळाली नसल्यामुळे पशुपती पारस नाराज

Sanjay Rauts reaction on Raj Thackerays grand alliance with bjp
Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरेंच्या महायुतीतील प्रवेशाच्या चर्चांवर संजय राऊत काय म्हणाले?

मनसेचे अध्यक्ष सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहचले. राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो आहे. अमित…

BJP struggle for Gadchiroli-Chimur Lok Sabha opposition to give seats to allies
गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी भाजपाची धडपड, मित्रपक्षाला जागा देण्यास विरोध; विद्यमान खासदारांसह पदाधिकारी एकवटले

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना आज, मंगळवारी गडचिरोली भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभेची जागा मित्रपक्षाला देण्यास विरोध केल्याने पुन्हा एकदा…

lok sabha elections 2024 bjp candidate for solapur constituency not yet finalized
सोलापुरात भाजपच्या उमेदवारीवरून चुरस वाढली; आजी-माजी खासदारांसह अनेक इच्छूक

संभाव्य उमेदवार म्हणून माजी खासदार अमर साबळे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावांची चर्चा सुरू

bsp sangeeta azad joins bjp
मायावतींच्या बसपला आणखी एक झटका; खासदार संगीता आझाद यांचा पतीसह भाजपात प्रवेश

आतापर्यंत मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षातील (बसप) अनेक नेत्यांनी पक्षाच्या धोरणांना विरोध करीत किंवा योग्य पक्षनेतृत्व नसल्याचे सांगत अन्य पक्षात…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×