नवी दिल्ली : स्विस दूरसंचार कंपनी एरिक्सनकडून ५७७ कोटी परत मिळविण्याचे रिलायन्स कम्युनिकेशन्सचे म्हणणे धुडकावून लावत कंपनीने याबाबत राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाकडे मागणी करावी, असे आदेश अपिल लवादाने बुधवारी दिले.

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या तिढा व्यावसायिकाने बुधवारी राष्ट्रीय कंपनी विधी अपिल न्यायाधिकरणासमोर एरिक्सनकडून ५७७  कोटी रुपये परत मागण्याविषयीचा अर्ज दाखल केला. एरिक्सनला दिलेले पैसे आम्हाला परत मिळवून द्यावे, ही रिलायन्स कम्युनिकेशन्सची मागणी मात्र अपिल न्यायाधिकरणाने फेटाळून लावली.

त्याचप्रमाणे कंपनी नादारी प्रक्रिया विधी प्राधिकरणाच्या मुंबई खंडपीठात सुरू असल्याने रिलायन्स कम्युनिकेशन्सने याबाबत तेथेच जावे, असेही सुचविण्यात आले. रक्कम परत मिळण्याविषयीचे सर्व म्हणणे तेथेच मांडावे, असेही कंपनीच्या तिढा व्यावसायिकाला सांगण्यात आले.

‘फंड कंपनीचे समभाग बँकांकडे तारण नाहीत’

मुंबई : रिलायन्स निप्पॉन लाईफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे कोणतेही समभाग बँकांकडे तारण नाहीत, असे फंड कंपनीची प्रवर्तक रिलायन्स  कॅपिटलने बुधवारी स्पष्ट केले. रिलायन्स कॅपिटलने फंड कंपनीतील हिस्सा म्हणून २२ टक्के समभाग बँकांकडे तारण ठेवल्याची चर्चा होती. त्या पाश्र्वभूमीवर कंपनीने हे स्पष्टीकरण दिले आहे. जेएम फायनान्शिअलने फंड कंपनीतील ८.६६ टक्के समभाग यापूर्वीच परत केल्याचे रिलायन्स कॅपिटलने मे २०१९ मध्ये जाहीर केले. त्याच महिन्यात रिलायन्स समूहाने जपानी विमा कंपनीला सर्व हिस्सा विकून फंड व्यवसायातून निर्गमन केले.

अमेरिकी उपकंपनीचाही दिवाळखोरीसाठी अर्ज, तोही पालक कंपनीच्या परवानगीविना

मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्सची उपकंपनी असलेल्या जीसीएक्सने अमेरिकेत दिवाळखोरी प्रक्रियेपासून बचावाकरिता याचिका दाखल केली आहे. मात्र याबाबत परवानगी घेण्यात आली नव्हती; तसेच याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे रिलायन्स कम्युनिकेशन्सने स्पष्ट केले. अमेरिकेच्या दिवाळखोर सिहतेच्या कलम १रक्कम परो गेल्या आठवडय़ात दिवाळखोरीपासून बचावाकरिता याचिका दाखल केली. जीसीएक्स ही कंपनी वित्तीय संकटाचा सामना करत असल्याचेही रिलायन्स कम्युनिकेशन्सने म्हटले आहे.