मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात नफावसुलीला प्राधान्य देत जून महिन्यात ५०,२०३ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला आहे. वाढती महागाई आणि त्यापरिणामी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे करण्यात येत असलेल्या व्याजदर वाढीमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी सलग नवव्या महिन्यात समभाग विक्रीचा मारा कायम ठेवला आहे.

एनएसडीएलने दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या वर्षांत ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, परदेशी  गुंतवणूकदारांनी समभाग विक्री सुरू ठेवली आहे. चालू कॅलेंडर वर्षांत (२०२२) पहिल्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांनी २.२ लाख कोटींचा निधी माघारी नेला आहे. त्याआधी २००८ या वर्षांत ५२,९८७ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडवलाच्या वाढत्या निर्गमनामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने गेल्या आठवडय़ात प्रथमच ७९ रुपये प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. विश्लेषकांच्या मते, नजीकच्या काळात भांडवली बाजारात अस्थिर वातारण कायम राहून समभाग विक्रीचा मारा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच फेडरल रिझव्‍‌र्हकडून वाढत्या व्याजदर वाढीमुळे रोख्यांवरील परताव्याचा दर आणि भांडवली बाजारातून मिळणारा परतावा यातील अंतर कमी होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतो आहे.