२२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ११० रुपयांनी वाढून ४६,५३० रुपये झाला आहे. पूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ४६,४२० रुपयांवर बंद झाले होते. गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चांदी १०० रुपयांनी वाढ होऊन ६५,४०० रुपये प्रति किलोवर विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यानच्या किंमतीमध्ये भारतभर बदल दिसून येतो.

काय आहे आजचा सोन्याचा दर?

नवी दिल्ली आणि मुंबई येथे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे ४६,६६० आणि ४६,५३० रुपये असा आहे, असे वेबसाइटने म्हटले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दरही १० रुपयांनी वाढून ४७,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५३० रुपये झाली आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,०६० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,५३० आहे आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,५३० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,८३० रुपये आहे तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९,०६० रुपये आहे.

चांदीचा भाव

कालच्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये १ रुपयांनी घट झाली आहे. आजचा चांदीचा दर हा ६५४ रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.(नमूद केलेल्या सोन्याच्या किंमतीमध्ये थोडा फरक असू शकतो, कारण किंमतींमध्ये चढ -उतार होतो आणि म्हणूनच स्थानिक ज्वेलर्सकडे किंमत तपासा)
भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.